Kinnaur Landslide: हिमाचल प्रदेशमध्ये बचाव कार्य सुरु; दरडीखाली दोघांचे मृतदेह सापडले; 10 जणांना वाचविले

 

Kinnaur Landslide: हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) च्या किन्नौरमध्ये बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळल्याने बस मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहे. याशिवाय अन्य काही गाड्या दरडीखाली सापडल्याने 50 ते 60 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. (A major landslide in Himachal Pradesh’s Kinnaur district on Wednesday has claimed the lives of two persons, according to officials. Over 40 people are feared buried under the debris.)

हिमाचल सरकारने (Himachal Government) सध्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर अन्य 6 लोकांना जखमी अवस्थेत वाचविण्यात आले आहे. बसमधील 30 जण अजूनही बेपत्ता आहेत. ही दुर्घटना किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यातील चौरा येथे राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. 


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले की, बचाव कार्य वेगाने करण्यात येत आहे. मोठमोठे दगड पडल्याने बचाव कार्य बाधित होत आहे. 10 लोकांना वाचविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या बसचा शोध सुरु आहे. 


आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे यांनी सांगितले की, निगुलसेरीमध्ये नॅशनल हायवे - 5 वर भूस्खलन झाले. आयटीबीपीच्या तीन बटालियनचे 200 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. डोंगरावरून अद्यापही दरड कोसळत आहे. दगड खाली येत आहेत. गेल्या तास भरापासून रेस्क्यू टीम भूस्खलन थांबण्याची वाट पाहत आहे. जवळपास 40 लोक अडकले असण्याची शक्यता आहे.  दरम्यान, किन्नौर येथील सांगला-छितकूल मार्गावर २५ जुलै रोजी भूस्थलन होऊन मोठी दुर्घटना घडली होती. येथे पर्वतावरून दगड पर्यटकांच्या वाहनावर कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area