दीपिका पादुकोण बॉडीगार्डला भाऊ मानते, पगार इतका की वाचून थक्क व्हाल

 

बॉलिवूडचे बडे स्टार्स म्हटले की, त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आलाच. स्टार्स जिथं जातील तिथं हे बॉडीगार्ड सावलीसारखे त्यांच्यासोबत असतात. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याबद्दल तर तुम्हाला ठाऊक आहेच. हा शेरा सतत भाईजानच्या मागेपुढे असतो. भाईजानही त्याला अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं वागवतो. आज आम्ही अशाच आणखी एका बॉडीगार्डबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं नाव जलाउद्दीन शेख उर्फ जलाल. हा जलाल (Jalal) म्हणजे बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) बॉडीगार्ड.


दीपिका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. साहजिकच चाहते तिच्यावर फिदा आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. अशा गर्दीपासून दीपिकाला वाचवण्याचा जिम्मा जलालच्या खांद्यावर आहे. जलालही अगदी सावलीसारखा दीपिकासोबत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिच्यासाठी काम करतोय.  दीपिका पब्लिक प्लेस कडे निघाली असेल आणि जलाल तिच्या सोबत नसेल असं कधीच होत नाही. दोन वर्षांपूर्वी इटली मध्ये दीपिका आणि रणवीर ने लग्न केलं. तेव्हा खूप पाहुणे लग्नाला येऊ शकत नव्हते. पण जलाल तिथे सुद्धा त्यांच्या सुरक्षे साठी पोहचला. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की दीपिका साठी जलाल किती महत्वाचा आहे.


  ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, हा जलाल फक्त दीपिकाचा बॉडीगार्ड नाही तर त्यापेक्षा खूप काही आहे. होय,  दीपिका जलालला भाऊ  मानते आणि दरवर्षी त्याला राखीही बांधते.


जलालचा पगार

दीपिकाने जलालला भाऊ मानलं असलं तरी, बॉडीगार्ड म्हणून त्याला भरभक्कम पगार मिळतो. होय, दीपिकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जलालला 2017 मध्ये वर्षाला 80 लाख पगार मिळत होता. म्हणजे साधारणपणे महिन्याला साडे सहा लाख रुपये.  यानंतर त्याचा पगार वाढवण्यात आला. एका रिपोर्टनुसार, आता त्याचे वर्षाचे पॅकेज 1 कोटी रूपयांचे आहे. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती 83 या सिनेमात दिसणार आहे. अमिताभ बच्चन सोबतचा ‘इंटर्न’ आणि शाहरूख सोबतचा ‘पठान’ तिने साईन केला आहे. याशिवाय फायटर आणि प्रोजेक्ट के या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area