भयावह! भाजपा नेत्याला अज्ञातांनी कारमध्ये कोंडून जिवंत जाळले

 हैदराबाद - तेलंगाणामधून एक भयावह घटना समोर आली आहे. येथे काही अज्ञात व्यक्तींनी भाजपाच्या एका नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळले. यामध्ये भाजपाच्या या नेत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons)

ही घटना तेलंगाणामधील मेडक जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मेडकच्या एसपी चंदना दिप्ती यांनी सांगितले की, काही लोकांनी भाजपा नेत्याला त्याच्या कारमध्ये कोंडून त्या कारला आग लावली. आम्हाला त्या जळलेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area