Shocking! मोबाइल जमिनीवर उल्टा ठेवून स्कर्ट घातलेल्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ, तरूणाला अटक

 

राजस्थानच्या जयपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आमेर महालात परदेशी महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवताना एका तरूणाला पकडलं आहे. जयपूर महिला निर्भया स्क्वॉडने सोमवारी कारवाई करत तरूणाला अटक केली. ज्यानंतर चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तरूण फारच हुशारीने आमेरमध्ये फिरायला आलेल्या महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवत होता. चौकशीतून समोर आलं की, तरूण जयपूर शहरात साधारण ७ ते ८ पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन असे अश्लील व्हिडीोओ बनवत होता.  आमेर महालमध्ये सोमवारी एक तरूण शूजची लेस बांधत होता. असं करणं सामान्य बाब आहे. पण हा तरूण पुन्हा आपल्या शूजची लेस काढत होता आणि पुन्हा बांधत होता. तिथे साध्या वेशात तैनात असलेल्या निर्भया महिला स्क्वॉडच्या पोलिसकर्मीने जेव्हा त्याला असं करताना पाहिलं तर तिला तरूणाचं असं वागणं संशयास्पद वाटलं.

महिला पोलिसाने त्या तरूणावर नजर ठेवली आणि तिने जेव्हा  लक्ष देऊन पाहिलं तर तिला दिसलं की, तरूण जेव्हा शूजची लेस बांधत होता तेव्हा फोनचा कॅमेरा ऑन करून जमिनीवर ठेवत होता. हे तो तेव्हाच करत होता जेव्हा एखादी तरूणी स्कर्ट किंवा फ्रॉकमध्ये दिसत असेल. (हे पण वाचा : प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, पोलीस स्टेशनसमोरच दोन्ही परिवार आपसात भिडले)


तरूण त्यांच्या अंडरगारमेंट्सचे अश्लील व्हिडीओ बनवत होता. निर्भया स्क्वॉडच्या पोलीस प्रेमलता यांनी ही बाब त्या तरूणीला सांगितलं तर तिलाही धक्का बसला. तिचा अश्लील व्हिडीओ कुणीतरी बनवला आणि तिला खबरही लागली नाही. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी तरूण अडीच महिन्याआधी माउंट आबूला फिरायला गेला होता. यावेळी त्याची ओळख दोन तरूणांसोबत झाली होती. त्यांनीच याला अशाप्रकारे अश्लील व्हिडीओ बनवण्याबाबत सांगितलं. त्यांच्याकडून माहिती घेऊनच तरूण जयपूरमद्ये तरूणींचे अश्लील व्हिडीओ बनवू लागला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area