पोलीस कोठडीत मृत्यू : मोदी-शहांचं गृहराज्य काळ्या यादीत अव्वल क्रमांकावर!

 

नवी दिल्ली : देशभरात पोलीस कोठडी दरम्यान सर्वाधिक मृत्यूंत उत्तर प्रदेशला मागे टाकत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर दाखल झालंय. तर न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

गृह मंत्रालयाची माहिती
पोलीस कोठडीतील मृत्यूंविषयीची माहिती गृह मंत्रालयाकडून नुकतीच राज्यसभेत देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी काळ्या यादीत यावं, ही गोष्ट नक्कीच धक्कादायक ठरलीय.

राज्यसभेत विचारण्यात आला प्रश्न
राज्यसभेत खासदार रामकुमार वर्मा यांनी गृह मंत्रालयाला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. गेल्या तीन वर्षांत पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दरम्यान देशातील वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या मृत्यूंचा आकडा उपलब्ध करून देण्याची मागणी वर्मा यांनी राज्यसभेत केली होती.

या प्रश्नाला उत्तर देताना गृह मंत्रालयानं २०२०-२१ साली पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू गुजरात राज्यात झाल्याचं सांगितलं. तर याच कालावधीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असल्याचंही गृह मंत्रालयानं म्हटलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area