Shocking! मुलीनेच केली मित्राच्या मदतीने वडिलांची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल

मध्य प्रदेशच्या ग्लाव्हेरमधून ५८ वर्षीय एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनुसार, तरूणीच्या वडिलाचा तिच्या अफेअरला विरोध होता आणि त्यामुळे आपल्या प्रेमाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी मुलीनेच वडिलाची हत्या केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '४-५ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना सूचना मिळाली की, तृत्पी नगरमध्ये रविदत्त दुबे नावाच्या व्यक्तीवर घरात घुसून कुणीतरी गोळी झाडली. घटनेवेळी घरात रविदत्त, त्यांची पत्नी, दोन मुली आणि मुलगा झोपलेले होते. फायरिंगच्या आवाजाने ते उठले. तेव्हा त्यांना दिसलं की, रविदत्त रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले आहेत.  त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.


यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केली. तपासाच्या सुरूवातीलाच पोलिसांना सर्वात संशयास्पद ही बाब वाटत होती की, कुणी घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन हत्या कशी करू शकतो?


तपासादरम्यान पोलिसांनी परिवारातील लोकांचे कॉल डिटेल्स काढले. तेव्हा संशयाची सुई मृतकाच्या लहान मुलीवर गेली. कारण तिच्या मोबाइलवरून गेल्या २ आठवड्यात सर्वात जास्त कॉल्स पुष्पेंद्र नावाच्या तरूणाला लावले गेले होते.


तपासातून समोर आलं की, मृतकाच्या लहान मुलीचं ज्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. त्याला रविदत्तने मारहाण केली होती. ज्या तरूणासोबत मुलगी सतत बोलत होती तो तिच्या बॉयफ्रेन्डचा मित्र होता. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली तर ती फार काळ सत्य लपवून ठेवू शकली नाही. नंतर तिने सगळं सांगितलं.


पोलिसांना तिने चौकशी दरम्यान सांगितलं की, हत्येसाठी मृतकाच्या लहान मुलीने पुष्पेंद्रला तयार केलं होतं आणि यासाठी तिने त्याला पैसे देण्याबाबत आणि त्याच्यासोबत अफेअर करण्याबाबत आमिष दिलं होतं. हत्येच्या रात्री मृतकाच्या मुलीने आरोपी तरूणाला आधीच घरात लपवलं होतं. आणि जेव्हा सगळे झोपले तेव्हा तो हत्या करून फरार झाला होता.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area