2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी

 

2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी

मुंबई : कोरोनामुळे अनेकांची आर्थिक गणितं ढासाळली. मात्र, मुंबईत कोरोनाने शुटिंग बंद झाल्यानं टॉप मॉडेल आणि अभिनेत्रींनी थेट सेक्स रॅकेटचा सहारा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जुहुतील एका पंचतारांकित हॉटेलमधून एका अभिनेत्रीला आणि मॉडेलला ताब्यात घेतलंय. या अभिनेत्रीने टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय, तर मॉडेलने अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिरात केलीय. या मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासासाठी दोन लाख रुपये चार्ज करत होत्या.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी मॉडेल आणि अभिनेत्रीला अटक केलेलं नसून त्यांची सुटका केल्याचं म्हटलंय. तसेच ग्राहकांसोबत पैशांची बोलणी करणाऱ्या दलाल महिलेला मात्र अटक करण्यात आलीय. आरोपी दलालाचं नाव इशा खान असं आहे. ती ग्राहकांशी फोनवर बोलून मॉडेल निश्चित करायची. यासाठी ती त्यांचे फोटो ग्राहकांना पाठवायची. फोटो पाहून निवड झाली की वेळ आणि ठिकाण ठरवून पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बूक केली जायची. यासाठी ती ग्राहकाकडून 2 तासांचे 2 लाख रुपये घ्यायची. यातील 50 हजार रुपये दलाल घेत, तर उर्वरित दीड लाख संबंधित मॉडेल किंवा अभिनेत्रीला दिले जायचे.

अभिनेत्री आणि मॉडेलचा सेक्स रॅकेटमध्ये सहभाग कसा?

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिनेत्री आणि मॉडेलने सांगितलं की कोरोना काळात त्याच्या हातातील शुटिंगचं काम बंद झालं. कुठेच काम मिळत नसल्यानं आर्थिक अडचण आली. त्यानंतर या दलाल महिलेच्या संपर्कात येऊन या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्याची माहिती अभिनेत्रीने पोलिसांना दिली.

मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कसा केला?

मुंबई पोलिसांनी ग्राहक बनून दलाल महिलेशी संपर्क केला. तसेच तिला मित्रांना टॉप मॉडेल हव्या असल्याचं सांगितलं. यानंतर दलाल महिलेने फोटो पाठवून 2 तासाचे 2 लाख रुपयांवर डिल फिक्स केली. मात्र, मुंबई पोलिसांनी ग्राहक बनून जात पंचतारांकित हॉटेलच्या बाहेरचं दलाल महिलेसह मॉडेल आणि अभिनेत्रीला ताब्यात घेतलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area