२५ काेटींच्या ‘गिफ्ट’चे आमीष; अकाेल्यातील वृध्दाला ५६ लाखांचा गंडा

अकोला: काैलखेड परिसरातील लहरीया नगर येथील रहिवासी असलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फेसबुकवरील फ्रेंडने २५ काेटी रुपयांचे गीफ्ट पाठविणार असल्याचे आमीष दिले. या आमिषापाेटी त्यांना गत १५ दिवसातच तब्बल ५६ लाख रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी खदान पाेलिसांनी ११ जनांविरुध्द गुन्हा दाखल करून एका नायजेरीयन तरुणासह बंगलाेर येथील एकास अशा दाेन आराेपींना अटक केली़.

लहरीया नगर येथील रहिवासी आत्माराम रामभाऊ शिंदे यांनी फेसबुकवर खाते उघडल्यानंतर त्यांनी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यानंतर ठगबाजांनी त्यांना ओळख दाखवत संभाषण सुरू केले. त्यापैकी एकाने आत्माराम शिंदे यांना सांगीतले़ की, ताे अमेरीकतील रहिवासी आणी सैन्यात कार्यरत असून सद्या इस्त्रायल येथे कर्तव्यावर आहे. या दाेघांच्या संभाषणात त्या सैनिकांने २५ काेटी रुपयांची एक पेटी या इस्त्राईल येथील सैनीकाकडे असल्याचे सांगत ही पेटी ताे अमेरीकेत घेउन जाउ शकत नाही अशी बतावणी केली़ ही २५ काेटी रुपयांची पेटी भारतात पाठवून शिंदे यांना देण्याचे आमीष दिले़ मात्र त्या माेबदल्यात विविध टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगीतले़ याच आमीषाला बळी पडत केवळ १५ दिवसांच्या कालावधीत शिंदे यांनी तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम विविध राज्यातील बॅंक खात्यात पाठवीली़ ही रक्कम ठगबाजांनी तातडीने काढूनही घेतली़ त्यानंतर फसवणुक झाल्याचे आत्माराम शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पाेलिस ठाण्यात दिली़.


खदान पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० , ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला़ या प्रकरणात नायजेरीयन येथील रहिवासी हरीसन इंगाेला रा़ डेल्टा सीटी नायजेरीया यास मुंबइतून अटक करण्यात आली़ तर दुसरा आराेपी बंगलाेर येथील रहिवासी नसीमुद्दीन यालाही पाेलिसांनी बेडया ठाेकल्या आहेत़ ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतीरीक्त् पाेलीस अधीक्षक माेनीका राउत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे प्रमूख नितीन शिंदे, खदानचे ठाणेदार डी़ सी़ खंडेराव यांनी केली़

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area