"माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तरी माझे कोणीही वाकडं करू शकत नाय", अशी धमकी देत महिलेवर केला अत्याचार

 

पिंपरी : माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तरी माझे कोणीही वाकडं करू शकत नाय' अशी धमकी देत व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केले. तसेच मोबाईलमध्ये चित्रिकरण करून ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमाटणे (ता. मावळ), दिल्ली पठाणकोट, अमृतसर, सुरत गुजरात येथे मार्च ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

किरण रंभाजी घारे (वय ४०, रा. बेबडओहळ, ता. मावळ), दीपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय ४६, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित २६ वर्षीय महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. ९) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने घारे याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने उसने घेतले होते. त्याबदल्यात त्याला ५० हजार रुपयांचे दोन चेक दिले होते. परंतु त्याने व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली. त्याला महिलेने नकार दिला असता त्याने नवरा व मुलगा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेला चारचाकी वाहनात बसून पिस्तुलाचा धाक दाखवून दिल्ली, पठाणकोट, अमृतसर व सुरत गुजरात येथे घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून फिर्यादीला ब्लॅकमेल करून वारंवार लैंगिक अत्याचार केले. माझ्या विरुद्ध तू कुठेही तक्रार द्यायला गेली तरी कोणीही माझे काही वाकडे करू शकत नाही, असे घारे हा महिलेला म्हणाला. तुमच्या घरी बायका पाठवतो तेव्हा तुम्ही पैसे द्याल, अशी धमकीही आरोपीने दिली.


घारे हा गुंड प्रवृत्तीचा असून तो फिर्यादीच्या परिस्थितीचा फायदा घेईल हे माहीत असतानाही त्याची चांगली व्यक्ती म्हणून ओसवाल याने महिलेशी त्याची  ओळख करून दिली. यातून ओसवालने महिलेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area