पुण्यातील बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर केले चाकूने वार

 पुणे : फिरायला गेलेल्या युगुलापैकी तरुणीवर तिघा चोरट्यांनी वार करुन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा प्रकार बोपदेव घाटात घडला आहे. याप्रकरणी ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या तरुणाने कोंढवापोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बोपदेव घाटात सोमवारी रात्री ११ वाजता घडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या मैत्रिणीसह सोमवारी बोपदेव घाटात फिरायला गेला होता. रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरत होते. यावेळी तरुणी नैसर्गिक विधीसाठी बाजूला गेली होती. त्याचवेळी तिघा चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार करुन जखमी केले. तिच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोनसाखळी, तरुणाकडील १ हजार रुपये रोख व पाकिट असा २६ हजार १०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area