खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युवती व तिची बहिण वेताळे येथून राजगुरूनगर शहरात संगणकक्लास साठी येत होत्या. क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी वेताळे येथे जाण्यासाठी एसटी बसस्थानकात आल्या. दरम्यान अक्षदा हि राजगुरुनगर शहरात जाऊन येते असे सांगून गेली. मात्र ४ तास वाट पाहूनही अक्षदा परत आली नाही. भिमानदी काठी नवीन पुलाजवळ दत्त मंदिरात लोखंडी अँगलला ओढणीने अक्षदा हिने फाशी घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटवून घरातील कुटुंबाला कळविले. आत्महत्या की हत्या यांचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.