शिरूरमधील धक्कादायक घटना! जमीनीच्या वादातून केला सख्ख्या भावाचा खून

 

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे शेत जमिनीच्या वादातून दांडक्याने झालेल्या मारामारीत भाऊ राणू जाधव ( वय 60 ) यांचा खून झाला आहे. याबाबत मूलगा संतोष भाऊ जाधव याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी बाबाजी रानु जाधव, पुष्पा बाबाजी जाधव व शितल रानु जाधव ( सर्व रा. शितोळे वस्ती कवठे येमाई ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.    


संतोष जाधव यांने सांगितले की, रविवारी सकाळी ११.३४ वाजता मी आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे उपचारासाठी गेलो होतो. त्यावेळी माझा मित्र सागर मुलमुले याचा मला अचानक फोन आला. त्याने सांगितले की, तुझे चुलते बाबाजी, चुलती पुष्पा व चुलत बहीण शितल हे तुझे वडील भाऊ जाधव यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत आहेत. हे ऐकून मी आमच्या घराजवळ आलो. तेव्हा तेथे माझे वडील रोडच्या कडेला पडले होते.


त्यानंतर उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कांबळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area