पोरानं खिशातून १ रुपया काढला तर बापानं दिली तालिबानी शिक्षा; क्रूर घटनेनंतर निर्दयी बापाचा मृत्यू

चाईबासा – झारखंडच्या चाईबासा येथे ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी खिशातून १ रुपयाचा सिक्का काढल्यानं संतापलेल्या बापानं पोटच्या मुलाला तालिबानी शिक्षा दिली आहे. निर्दयी बापानं मुलाचा हात उकळत्या पाण्यात बुडवला. त्यामुळे या मुलाचे दोन्ही हात भाजले. आता अडीच महिन्यांनी उपचारानंतर मुलाच्या दोन्ही हाताची दहाही बोटं कापण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

चाईबासा येथील चिंता बोईपाई यांनी त्यांच्या १० वर्षाचा मुलगा बुधराम याला १ रुपयाचा चोरण्याची शिक्षा दिली आहे. मुलाचे दोन्ही हात उकळत्या पाण्यात टाकले. त्यानंतर या मुलावर उपचार करण्यात आले. परंतु काही काळानंतर दोन्ही हाताची बोटांना एलर्जी होण्यास सुरुवात झाली. अशावेळी रांचीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये बुधराम याच्या दोन्ही हाताची सर्व बोटं कापावी लागली. जेणेकरून त्याचा हात वाचवू शकतो.


वडिलांचा मृत्यू

 या घटनेनंतर बुधरामचे वडील फरार झाले होते. परंतु दारुच्या व्यसनामुळे १७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. चिंता बोइपाई यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या पत्नीपासून त्यांना ५ मुलं आहेत तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना ३ मुलं आहेत. बुधराम हा दुसऱ्या पत्नीचा मोठा मुलगा आहे.


काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधराम हा खूप भूकेला होता. त्यासाठी दुकानातून काही आणण्यासाठी त्याने १ रुपया घेतला होता. परंतु चिंता बोइपाई यांना ही गोष्ट कळताच त्यांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी मुलाला बेदम मारलं. इतक्यावरच मन भरलं नाही म्हणून त्याने गरम पाण्यात मुलाचा हात बुडवला. मुलगा आक्रोश करू लागला परंतु त्याला दया आली नाही. मुलाचा आवाज ऐकताच जेव्हा आई बाहेर आली तेव्हा तिने मुलाला वाचवलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area