रात्री प्रेयसीला भेटायला आला होता सब-इन्स्पेक्टर, गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारलं!

 

उत्तर प्रदेशमद्ये आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची गावातील लोकांनी चांगलीच धुलाई केली. आधी पोलिसाला खांबाला बांधलं आणि त्यानंतर त्याला काठ्यांनी मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाला गावकऱ्यांनी वेढा दिला तेव्हा त्याने त्याच्या रिवॉल्वरने फायरिगं केली होती. फायरिंगनंतर लोकांना राग आला आणि त्यांला चांगलीच मारहाण केली. 

बस्ती जिल्ह्यातील ऊंजी गावातील ही घटना आहे. येथील पोलीस अशोक कुमार चतुर्वेदीला गावकऱ्यांनी मारहाण केली. तेव्हा तो गावात त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना खांबाला बांधून लोकांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. (हे पण वाचा : घरातून पळून जाऊन मैत्रीणीसोबत लिव-इनमध्ये राहू लागली तरूणी आणि मग...)


पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते कसे तरी त्याला जीव वाचवून पोलीस स्टेशनला घेऊन  गेले. या पोलिसाचा गावकरी अनेक दिवसांपासून शोध घेत होते. तो नेहमीच रात्रीच्या वेळी गावात आपल्या प्रेयसीला भेटायला येत होता. पण गेल्या रात्री जेव्हा तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला आणि बाइक प्रायमरी शाळेजवळ ठेवली. नंतर तरूणीच्या घरात शिरला. गावकऱ्यांना संशय आला तर ते त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी घराबाहेर त्याचा वाटत पाहत बसले होते. जेव्हा तो रात्री ३ वाजता घरातून निघाला गावकऱ्यांनी त्याला पकडलं


गावकऱ्यांचा आरोप आहे की, लोकांची गर्दी पाहून त्याने सरकारी रिवॉल्वरने हवेत फायरिंग केली. फायरिंगचा आवाज ऐकताच जास्त प्रमाणात लोक जमा झाले. त्यांनी आधी पोलिसाला मारहाण केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून त्याला मारलं. सूचना मिळाल्यावर पोलिसांना कसातरी त्याचा जीव वाचवला.  घटनेची सूचना मिळाल्यावर एसपी आशीष श्रीवास्तव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. ते म्हणाले की, एसआयवर गावकऱ्यांनी फायरिंगचा आरोप लावला. तो वर्दीत गावात आला नव्हता. एसआयला पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area