Woman cheated: अशीही शक्कल! महिलेला गंडवण्यासाठी चोरट्याने घेतला हॉटेलच्या थाळीचा आधार

 

पुणे: एका नामांकित हॉटेलच्या थाळीवर सवलत असल्याची बतावणी करून चोरट्याने मगरपट्टा सिटी भागातील एका महिलेला एक लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मगरपट्टा सिटी भागात राहण्यास आहे. त्यांच्या मोबाइलवर चोरट्याने संपर्क साधला होता. शहरातील एका नामांकित नामांकित हॉटेलमधील थाळीवर सूट देण्यात येणार आहे, अशी बतावणी महिलेला केली. थाळीची नोंदणी करण्यासाठी एक लिंक पाठवितो, असे चोरट्याने महिलेला सांगितले. चोरट्याने महिलेला पाठविलेल्या लिंकमधून तिची वैयक्तिक माहिती घेतली. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून चोरट्याने एक लाख ४४ हजार ४९७ रुपये लंपास केला.

महिलेला खात्यामधून पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समजला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजू अडागळे हे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area