Video : मुस्लीम भंगारवाल्यास 'जय श्रीराम'चा नारा देण्यासाठी मारहाण, व्हिडिओ व्हायरल

इंदौर - मथुरा येथे डोसा विक्रेत्याला श्रीनाथ नावाने आपले डोसा विक्रीचे दुकान चालवत असल्याने त्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता इंदौरमधूनही एकाच एक प्रकार समोर आला आहे. उज्जैन येथील एका मुस्लीम भंगारवाल्या व्यक्तीला काही समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली आहे. मुस्लीम भंगारवाला मुस्लीमेत्तर परिसरात जाऊन भंगार गोळा करत असल्याने त्यास जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले. 

उज्जैनच्या सेकली गावातील ही घटना असून मुस्लीम भंगारविक्रेत्यानं काही टोळक्यांच्या दबावामुळे जय श्री राम म्हटले. तरीही, या त्यास मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या भंगारवाल्या व्यक्तीस पुन्हा गावात पाय ठेऊ न देण्याची धकमी या समाजकंटकांनी दिली होती. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित घटनेवरुन काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मामू म्हणत प्रश्न विचारला आहे. हे गुन्हेगारी कृत्य नाहीये का? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी डिजीपी यांनाही विचारला आहे. या युवकांवर कारवाई कधी होणार, आता, हद्द पार होतेय... असेही सिंह यांनी म्हटले. 


मथुरेतही डोसा विक्रेत्याची गाडीची तोडफोड

देविराज पंडित नावाच्या एका फेसबुक युजर्संने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जमावाकडून डोसा विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर सध्या वेगाने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मुथरा येथील विकास बाजारचा हा व्हिडिओ असून एका मुस्लीम डोसा विक्रेत्याच्या गाड्यावर तोडफोड केल्याची कॅमेऱ्या दिसून येते. तुम्ही हिंदू नाव लावून का दुकान चालवता, ते नाव पाहूनच हिंदूधर्मीय लोक इच्छा नसतानाही येथे खायला येतात, असे त्यास मारहाण करण्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area