खळबळजनक! दुकानात बंदूक कशाला आणली? सोळा वर्षांच्या मुलावर झाडल्या गोळ्या

पिंपरी : दुकानात बंदूक कशाला आणली? असे विचारणाऱ्या सोळा वर्षीय मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. शिवराजनगर, रहाटणी येथे रविवारी रात्री पावणे नऊ ते सव्वानऊच्या दरम्यान ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ओवेज इसाक इनामदार (वय १६, रा. काळेवाडी), असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील इसाक इस्माईल इनामदार (वय ४०, रा. विजयनगर, काळेवाडी,) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्या फिर्याद दिली. किरण शिवाजी वासरे (वय २१, रा. रहाटणी), असे आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक इनामदारांचा मेहुणा शाहरूख सय्यद यांचे शिवराजनगर येथे एक्सपर्ट मोबाईल पॉईंट नावाचे दुकान आहे. त्या दुकानात त्यांचा मुलगा ओवेज हा रविवारी रात्री थांबला होता. त्यावेळी वासरे हा मोबाईल चार्जर कॉड मागण्यासाठी दुकानात आला. त्यावेळी वासरेकडे बंदुक होती.


बंदूक येथे कशाला आणली. तू येथून जा, नाहीतर मी तुझी तक्रार पोलिसांत करेन, असे ओवेज हा किरणला म्हणाला. त्या कारणावरून वासरेला राग आला. त्याने ओवेज याला शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर वासरेने त्याच्याकडील बंदुकीतून गोळी झाडून ओवेज याचा खून केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area