सौरभ व त्याचे मित्र लखन कासले व नामदेव सोडगे हे काळेपडळ रोडवरील समृद्धी रेस्टॉरंटसमोर रविवारी दुपारी बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले़. त्यांनी सौरभ याला जवळ बोलावून जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन कोयत्याने सौरभच्या हातावर व डोक्यात वार केले. तसेच इतरांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
मारहाण करताना कुंदर याने ‘मी या गल्लीतला भाई आहे,’ असे हत्यारासह ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.