गडचिरोलीत खळबळ; २६ वर्षीय युवकाने केली एकाची हत्यागडचिरोलीत खळबळ; २६ वर्षीय युवकाने केली एकाची हत्या

 गडचिरोलीः २६ वर्षीय युवकाने एका ४२ वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना आज २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. इंद्रजित गोविंद नमो (४२) रा.खुदीरामपल्ली, ता- मुलचेरा, जिल्हा गडचिरोली असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार काल २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खुदीरामपल्ली येथील मुख्य चौकात किशोर चक्रवर्ती यांच्या दुकानात मृतक इंद्रजित गोविंद नमो आणि हत्या करणारा युवक अभिजित प्रसंजीत माली या दोघांमध्ये वाद झाला. दोघांचा वाद विकोपाला जाऊन अभिजित माली या २६ वर्षीय युवकाने इंद्रजित नमो यांच्यावर चाकूने हल्ला केला.यात इंद्रजित नमो याच्या गालावर (कानाखाली) जबर मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

ही घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. रात्री उशीर झाल्याने त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले नाही. आज मृतक इंद्रजीत नमो त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मुलचेरा चे ठाणेदार प्रशांत जुमडे हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area