‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदे नंतरच कारखाने सुरु होतात, राजू शेट्टींचा खोचक टोला

 कोल्हापूर : ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन दरवर्षी (Swabhimani Shetkari sanghtna) स्वाभिमानी शेतरकरी संघटनेची ऊस परिषद ही पार पडत असते. यंदा ही ऊस परिषद 19 ऑक्टोंदर रोजी होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले (Raju Shetti) आहे. शिवाय मंत्री समितीने 15 ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याची दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही आणि हीच परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाही हाताळले जाणार आहेत. सध्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी पुर्वीच सरकारने मदत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साखर कारखानदारांना यंदा चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाटाघाटीमुळेच एफआरपी रक्कम तीन टप्प्यांमध्ये

एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना एकदम मिळणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे. मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देण्याचे धोरण ठरवतात हे चुकीचे आहे. यांच्यातील वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र, आर्थिक नुकसान होत आहे. 14 दिवसांच्या आतमध्ये एफआऱपी रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा वापरत आहे.

जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची

एफआरपी रक्कम ही एकरकमी देणे हा नियम आहे. या रकमेचे तील तुकडे केले तर नवरात्रीपासून ‘जागर एफआऱपी चा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार आहे. राज्यातील विविध ठिकाणची शक्ति स्थळांची आराधना करुन दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे आंदोलनाची सांगता होणार आहे.

ऊस परिषदेत हे असणार आहेत मुद्दे

यंदाची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे पार पडणार आहे. 19 ऑक्टोंबरला या परिषदेला सुरवात होणार आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर प्रश्न असणार आहेतच शिवाय पावसामुळे नुकसान झालेल्य़ा शेतकऱ्यांनाही वेळेत मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे. सरकारने त्वरीत मदत नाही केली तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Information about Raju Shetty, Sugarcane Council of Swabhimani Kisan Sangathan on October 19)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area