Murder Mystery: आंतरराष्ट्रीय बायकरचा मृत्यू : सामान्य मृत्यू नाही तर हत्या, तीन वर्षानंतर खुलासा

 


जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेरमधून सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशी एक मर्डर मिस्ट्री समोर येतेय. तीन वर्षांपूर्वी मूळ केरळचा रहिवासी असलेल्या एका आंतरराष्ट्रीय बायकरचा राजस्थानमध्ये मृत्यू झाल्याची घटना होती. आतापर्यंत सामान्य मृत्यू समजल्या जाणाऱ्या या घटनेत हत्येचं नवं वळण समोर आलं आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात बायकरच्या दोन मित्रांना बंगळुरूमधून अटक केलीय. बायकरच्या पत्नीसोबत मिळून मित्रांनीच त्याची हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. याचे काही पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Jaisalmer murder mystery : International bike rider death, two arrested by rajasthan police)

जवळपास तीन वर्षांपूर्वी 'इंडियन बाजा मोटरस्पोर्टस डकार चँलेंज रॅली' दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर बायकर म्हणून ओळख मिळवणारा ३४ वर्षीय असबक मोन जैसलमेरमध्ये दाखल झाला होता. इथेच त्याचा मृत्यू झाला होता.

काय घडलं त्या दिवशी?

असबाक हा मूळचा केरळच्या कन्नूरचा रहिवासी होता. काही वर्षांपासून तो बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये स्थायिक झाला होता. बंगळुरूमध्ये येण्यापूर्वी तो काही दिवस दुबईतही राहत होता.

१५ ऑगस्ट २०१८ रोजी शाहगढ बल्जमध्ये रायडिंग ट्रॅक पाहणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट २०१८ रोजी असबाक आपल्या मित्रांसोबत रायडिंगसाठी निघाले होते. या दिवशी असबाकशिवाय सर्व परतले. यानंतर दोन दिवसांनी असबाकचा मृतदेह आढळला. यावेळी त्याची बाईक स्टँडवर उभी केलेली होती तसंच त्यावर हेल्मेटही ठेवण्यात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, या जागेवर मोबाईल नेटवर्क नव्हतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area