पुणेकरांसाठी खुशखबर! झोपडीधारकांना 300 चौरस फुटांचा फ्लॅट मिळणार

 


पुणे: राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना 300 चौरस फुटांची सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी कमाल तीनपर्यंत एफएसआय वापरण्याची मर्यादा काढून किमान चार एफएसआय देण्यात आला आहे.त्यामुळे आता मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना 300 चौरस फुटांच्या सदनिका मिळणार आहेत. (Slum area people will get 300 square feet home in Pune and pimpri chinchwad)

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित बांधकाम नियमावलीस राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर त्याचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात अनेक बदल करण्यात आले होते. यामध्ये झोपडीधारकांना 269 चौरस फुटांऐवजी 300 चौरस फूट घर मिळेल. यासाठी केवळ 51 टक्के लोकांनी सहमती दिली असली तरी ही योजना राबवण्यात येणार आहे.

सध्याची स्थिती काय?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रलंबित आहेत. शहरांमध्ये सुमारे 600 झोपडपट्ट्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही शहरे झोपडपट्टीमुक्त होण्यास चालना मिळू शकेल. 300 फुटांचे घर मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणेकरांच्या नावाला धक्का लागू देणार नाही

अजित पवार यांनी सदनिका धारकांना नव्या घरात प्रवेश करुन चांगल्या जीवनाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला. ज्यांना घर मिळणार आहे त्यांनी ते विकण्याच्या फंदात पडू नये. तुम्हाला सन्मानाने जगता यावे, हा या योजनेमागचा हेतू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी दिलीय. पुणेकरांच्या नावाला धक्का लागत असेल तर त्याला लगाम घातला पाहिजे, तसा धक्का लागू देणार नाही. तसेच पुण्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला जाईल. सहकार भवन, कामगार भवन, कृषी भवन पुण्यात निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area