बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा… राजू वाघमारे आक्रमक

 


मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अनेकांचं बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकडे लक्ष लागलंय. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम होणार आहे. या बांधकामासंदर्भात स्थानिकांच्या काही मागण्या आहेत. पण त्या मान्य केल्या जात नाहीयेत. बीडीडी चाळीतल्या पुनर्विकासाला धरून असणाऱ्या स्थानिकांचा मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे स्थानिकांनी आता या पुनर्विकासाला विरोध करायला सुरुवात केलीय.

सरकारच्या धोरणाबाबत लक्षवेधी एकदिवसीय उपोषण

त्यात अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांचा एकत्रितपणे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बी.डी.डी. चाळ पुनर्बांधणी सरकारच्या धोरणाबाबत लक्षवेधी एकदिवसीय उपोषण केलेय. या उपोषणात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि स्थानिक सहभागी आहेत. काँग्रेसचे नेते राजू वाघमारे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. दसऱ्यापर्यंत या मागण्यांचा विचार करावा अन्यथा आक्रमक पाऊल उचलावे लागेल, असं वाघमारे म्हणालेत.

मागण्या काय आहेत?

प्रथम कायमस्वरुपी घराचा कायदेशीर आणि सुरक्षित करारनामा नंतर पुनर्विकास
33 (9) BIII मधील A आणि B कायदा रद्द करावा
वर्ष 1996 व त्या पूर्वीच्या पुराव्यांची अट रद्द करावी आणि वर्ष 2021 पर्यंत खोली खरेदी विक्री केलेल्या सर्व रहिवाशांना पात्र/अपात्र आणि अनिर्णित न करता पुनर्विकासमध्ये सामावून घेण्यात यावे.
33 (5) हा कायदा म्हाडाच्या 56 वसाहतींना लागू आहे . तोच कायदा बीडीडी चाळींकरिता लागू करावा. (जेणेकरुन 500 फुटांपेक्षा जास्त एरिया मिळेल.)
17 ते 25 लाखांपर्यंत कॉपर्स फंड मिळावा.
बायोमेट्रिक/पात्र /अपात्र व अनिर्णित अट रद्द करावी.

सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी

या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक , राजकीय नेते, कलाकार, अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे.

पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार

शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहे. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे.  प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area