Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच

 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरु असलेल्या खनिज तेलाच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून शनिवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 30 ते 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 30 पैशांनी वाढून 113.08 रुपये इतका आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांची वाढ झाल्यामुळे एका लीटरसाठी 103.97 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.24 आणि 95.98 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सेवेला इंधन दरवाढीचा फटका

कोरोना संकटामुळे अगोदरच रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वेगाने वाढ झाली आहे. डिझेलची किंमत वाढल्याने PMPML ची संचलन तूट तब्बल 600 ते 700 कोटी इतका होण्याचा अंदाज असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. गेल्यावर्षी ही तूट 497 कोटी होती. मात्र, यंदा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या दरात वाढ झाल्याने वित्तीय तुटीचा आकडा वाढला आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area