एका घरात सुरू होता देहव्यापार, सामाजिक कार्यकर्ती चालवायची रॅकेट


सिहोर: मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नगरच्या बस थांब्याजवळ एका घरात हे रॅकेट चालवले जात होते. कोतवाली पोलिसांनी कारवाई करत १० जणांना ताब्यात घेतले असून, त्यात चार तरुणी, तीन ग्राहक, एक ड्रायव्हर, संचालिका आणि महिला मॅनेजरचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलिसांनी नगर येथील बस थांब्याजवळील एका घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या ठिकाणी १० जणांना अटक केली. त्यात चार मुलींसह ग्राहकांचाही समावेश आहे. एका घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा या घरावर छापा मारला. पकडलेल्या मुली या भोपाळच्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना देहव्यापारासाठी या ठिकाणी आणले जायचे अशी माहितीही मिळाली आहे.

अनुपमा असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती स्वतःला एका राजकीय पक्षाची कार्यकर्ता असल्याचे सांगते. तसेच ती एक सामाजिक कार्यकर्ती असल्याचे सांगते. तिचे अनेक बड्या व्यक्तींसोबत सोशल मीडियावर फोटो आहेत. तिने नगरपालिकेची निवडणूकही लढवली आहे. त्यात ती पराभूत झाली होती. दरम्यान, पोलीस तिची कसून चौकशी करत असून, त्यात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे २८ हजारांची रोकड सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. या सर्व मुली भोपाळच्या असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area