आता तुला सोडत नाय! छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीनं रोडरोमियाला पट्ट्यानं चोपले

परभणी: सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीय तरुणीनं मुलाला भररस्त्यात चोप दिलाची घटना परभणी जिल्ह्यातील सेलु येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सेलू तालुक्यातील तळतुंबा गावात राहणाऱ्या मुलीला रवळगाव येथे राहणारा मुलगा दररोज छेड काढत त्रास देत होता. दोघेही आपल्या गावाकडून महाविदयालयाला ये-जा करत होते . दरम्यान,दररोज छेड काढत असल्याने अखेर मुलीने मुलास भररस्त्यात गाठून पट्ट्याने चांगलाच चोप दिला. या घटनेचे व्हीडिओ सध्या जिल्ह्यात व्हायरल होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area