बापरे! एक्स गर्लफ्रेंडने रेप केसची धमकी दिली; घाबरून 'त्याने' आत्महत्या केली; सुसाईड नोटने खळबळ

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एक्स गर्लफ्रेंडच्या त्रासाला वैतागून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ही घटना घडली. मनोज बैरवा असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून त्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला मोबाईलवर पाठवली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये मनोजने लिहिलं की, एक्स गर्लफ्रेंड त्याला सतत दबाव आणून पैशांची मागणी करते. आतापर्यंत त्याने 2 लाखांहून जास्त रुपये दिले आहेत. एक्स गर्लफ्रेंड रेप प्रकरणात फसवण्याची धमकी देत असे. याशिवाय जीव घेण्याची धमकी देत होती. तिचा नवा प्रियकरही या सर्वात सामील होता. यामुळे आत्महत्या करीत असल्याचं तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. मनोज बैरवा याने रात्री उशिरा मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. मनोज BA च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. 

पेंटरचं काम करू तो घरखर्च चालवत होता. गावातील एका तरुणीसोबतच तो रिलेशनशीपमध्ये होता. 5-6 महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. दोघेही एकमेकांसोबत नव्हते. यानंतर मात्र तरुणी त्याला ब्लॅकमेल करू लागली. दोन दिवसांपूर्वी त्याने 15 हजार रुपये उधार घेतले होते. त्यानंतर त्याने बाईकही पैशांसाठी ठेवली. त्याचा मोबाईल आणि पैसेही गायब आहेत.


आत्महत्येपर्वी मनोजने मोबाईलवर मोठा मेसेज केला होता. त्यात त्याने सर्व गोष्टींचा उल्लेख केला होता. ती दोन वर्षांपासून त्याला ब्लॅकमेल करीत आहे. एका महिन्याच्या आत तिने त्याच्याकडून 48 हजार रुपये घेतले होते. आतापर्यंत मी तिला दोन लाखांहून अधिक पैसे दिलेले आहेत. आता माझ्याकडे काहीच नाही. कुठून आणखी पैसे देऊ. माझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मी काय करू तेच समजत नाही असं देखील मनोजने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area